यशस्वी प्रचारातून हृदय रोग्याला जीवनदान
नाशिक, 26 सप्टेंबर (हिं.स.)। - दवाखान्याच्या दारातच कार्डीयाक अरेस्ट (ह्रदयविकाराचा झटका) येऊन कोसळलेल्या ५० वर्षीय व्यक्तीस अवघ्या ३ मिनिटात सीपीआर (कार्डीओ पल्मनरी रीसॅसिटेशन) व शॉक दिला गेल्याने तो व्यक्ती मृत्युच्या दाढेतून परत आला. ही किमया
कार्डियाक अरेस्टने ग्रस्त रुग्णाला  त्वरित उपचाराने जीवनदान, डॉ. अतुल वडगावकर यांचे यशस्वी उपचार


नाशिक, 26 सप्टेंबर (हिं.स.)। - दवाखान्याच्या दारातच कार्डीयाक अरेस्ट (ह्रदयविकाराचा झटका) येऊन कोसळलेल्या ५० वर्षीय व्यक्तीस अवघ्या ३ मिनिटात सीपीआर (कार्डीओ पल्मनरी रीसॅसिटेशन) व शॉक दिला गेल्याने तो व्यक्ती मृत्युच्या दाढेतून परत आला. ही किमया केली आहे करोना काळात हजारो रुग्णांचे प्राण वाचवणारे नाशिकचे प्रसिद्ध तज्ञ डॉ. अतुल वडगावकर व त्यांच्या विजय नर्सिंग होमच्या टीमने.

डॉ. वडगावकर म्हणाले की, रुग्ण प्रशांत शिंदे यांना तपासणी दरम्यान त्यांच्या हृदयामध्ये अनियमिता जाणवल्यामुळे आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांना त्वरित ऍन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. यानंतर हॉस्पिटल बाहेर पडताना ते रुग्णालयाबाहेरच कोसळले. यावेळी त्यांचे हृदय बंद पडल्याचे व श्वासोच्छवास थांबल्याचे लक्षात आले. याप्रसंगी समोर दोन पर्याय होते एक म्हणजे रुग्ण गंभीर आहे असे सांगून त्याची रवानगी शासकीय रुग्णालयात करणे आणि दुसरे म्हणजे एक डॉक्टर म्हणून उपलब्ध सर्व पर्यायांचा अवलंब करून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर केबिनमध्ये आणता आणताच हॉस्पिटलमधील स्टाफने त्यांना सीपीआर देणे सुरु केले. सीपीआर म्हणजे कार्डीओ पल्मनरी रीसॅसिटेशन ही कार्डीयाक अरेस्ट आल्यानंतरची सर्वात पहिली प्रक्रिया आहे. यामध्ये जेव्हा हृदय काम करणे थांबवते किवा हृदयाचे ठोके अनियमित होतात, अशा वेळेला हृदयावर दाब देऊन हृदयामधील रक्ताचा प्रवाह नियमित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. दरम्यान केबिनमध्येच आपत्कालीन सुविधांची सोय करण्यात आली आणि सीपीआर देतादेताच रुग्णाला ४०० ज्युल्सचे ३ शॉक देण्यात आले. या सर्व उपायांनी रुग्णाचे हृदय पूर्ववत धडधडायला लागले. यानंतर पुढील ३० मिनिटात रुग्णाला कार्डियाक ॲम्बुलन्सने नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलला नेण्यात आले व तेथे हृदयशल्य तज्ञ डॉ. प्रशांत पवार यांनी तातडीने ऍन्जिओग्राफी करून डाव्या बाजूच्या रक्तनलिकेमध्ये १०० टक्के ब्लॉक असल्याचे निदान केले. यानंतर त्वरित शस्त्रक्रिया करून २ स्टेंट टाकले गेले. हृदयाचे ठोके बंद पडल्यानंतर अवघ्या ५० मिनिटात सर्व उपचारांसहित हृदयाची रक्तवाहिनी पूर्णपणे उघडल्याने रुग्ण बरा झाला. याप्रसंगी रुग्ण प्रशांत शिंदे यांनी देखील तो आपला अनुभव कथन केला. ते म्हणाले की ते स्वतः धावणे तसेच पोहणे हे नियमित करतो. तसेच अगदी दहा किलोमीटर मॅरेथॉनमध्ये देखील स्वतः नियमित सहभागी होऊन हे अंतर अनेकदा पूर्ण केले आहे. डॉ. अतुल वडगावकर व त्यांच्या स्टाफने दाखवलेल्या तत्परतेमुळेच जीवनदान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande