आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये ‘एकात्म मानव दर्शन’ची गरज अधोरेखित - प्रशांत शंकरराव यादव
पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। जगभरातील बदलत्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींमध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्व पुन्हा एकदा स्पष्ट होत स्पष्ट होत आहे. अलीकडील तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय घटनांमधून हे प्रकर्षाने जाणवत असल्याचे प्रतिपादन ऍडव्होके
आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये ‘एकात्म मानव दर्शन’ची गरज अधोरेखित - प्रशांत शंकरराव यादव


पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। जगभरातील बदलत्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींमध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्व पुन्हा एकदा स्पष्ट होत स्पष्ट होत आहे. अलीकडील तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय घटनांमधून हे प्रकर्षाने जाणवत असल्याचे प्रतिपादन ऍडव्होकेट प्रशांत शंकरराव यादव यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात केले. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र - कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर,कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे आदी मान्यवरांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. त्यानंतर शिक्षणशास्त्र व विस्तार विभागातील सभागृहात यानिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पहिली घटना म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरलेले ‘टेरिफ कार्ड’, ज्यामुळे आयात-निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भांडवलशाहीचे हे छुपे शस्त्र जगातील आर्थिक संतुलन बिघडविणारे ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध, जे अद्याप थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन विचारसरणींच्या संघर्षाची तीव्रता या युद्धातून पुन्हा जाणवत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. तसेच याच पार्श्वभूमीवर तिसरी आणि सर्वांत प्रेरणादायी घटना घडली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इंडोनेशियाचे पंतप्रधानांनी आपले भाषण ‘ओम हरी ओम’ या भारतीय तत्वज्ञानाशी निगडित मंत्राने समाप्त केले. ९५ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशाचे पंतप्रधान भारतीय अध्यात्मिक परंपरेचा सन्मान करतात, ही घटना जागतिक पातळीवर आश्चर्यकारक आणि आशादायक मानली जात आहे, असे ऍडव्होकेट यादव यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande