नांदेड - इसापूर धरणाचे दरवाजे उघडले
नांदेड, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 26 सप्टेंबर 2025 रोजी 8 वाजता आणखी 4 गेट 0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याचे 9 गेट 0.50 मीटर ने चालू अस
नांदेड - इसापूर धरणाचे दरवाजे उघडले


नांदेड, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण

पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 26 सप्टेंबर 2025 रोजी 8 वाजता आणखी 4 गेट 0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याचे 9 गेट 0.50 मीटर ने चालू असून एकूण 9 गेटद्वारे पैनगंगा नदीपात्रात 15273 क्युसेक्स (432.491 क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन इसापूर धरण पूरनियंत्रण कक्ष यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande