पूरग्रस्तांना महिन्याचे धान्य, दिवाळीच्या साहित्याचेही नियोजन :  जयकुमार गोरे
सोलापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। महापुरात बाधित झालेल्यांना महिन्याभरात साधी सुई सुद्धा विकत घ्यायला लागू नये, या कुटुंबांना महिन्याचे धान्य, कपडे, कुटुंबातील महिलेला साडी, पुरुषाला कपडे आणि दिवाळीसाठी लागणारे साहित्य देण्याचेही नियोजन आम्ही केले आहे.
Jaykumar gore newss


सोलापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। महापुरात बाधित झालेल्यांना महिन्याभरात साधी सुई सुद्धा विकत घ्यायला लागू नये, या कुटुंबांना महिन्याचे धान्य, कपडे, कुटुंबातील महिलेला साडी, पुरुषाला कपडे आणि दिवाळीसाठी लागणारे साहित्य देण्याचेही नियोजन आम्ही केले आहे. महापुरामुळे बाधित झालेल्या ४० गावांसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. या अधिकाऱ्याच्या खाली पाच ते सहा अधिकारी असणार आहेत. किती आणि काय साहित्य आवश्‍यक आहे? याची माहिती दोन सर्व्हेद्वारे दोन दिवसांत संकलित होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.जिल्ह्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा नियोजन भवनात बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले, सीना नदीच्या महापुराचा फटका जिल्ह्यातील साधारण ४० गावातील ४५०० कुटुंबांना बसला असल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाजही त्‍यांनी व्यक्त केला. येत्या आठवड्यात पूरग्रस्तांचे जीवनमान सुरळीत केले जाईल. या कालावधीत नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे एकत्रित अहवाल पाठविला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande