शेतकऱ्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला
लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
गुंफेवाडी,करकट्टा,रामेगाव,मुरुड अकोला येथे खा.डॉ. शिवाजी काळगे स यांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी केली.
सध्या संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त झाला आहे.लातूर तालुक्यातील गुंफेवाडी, करकट्टा, रामेगाव, मुरुड अकोला येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी खा.डॉ. शिवाजी काळगे यांनी केली. शेतकरी बांधवानी पेरलेल्या सोयाबीन, उडीद, मूग तसेच ऊस या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असून नदी, ओढा, नाले याच्या काठी असणाऱ्या शेतजमिनीतील मातीही वाहून गेली आहे त्यामुळे शेतकरी बांधव पूर्णपणे हवालदिल झाला आहे. अश्या संकटकाळी आम्ही शेतकऱ्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी दिला.
शासनाने सुद्धा अंत न पाहता शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री डॉ. दिनेश नवगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष (श. प.) श्री संजय शेटे, तालुका काँग्रेस चे अध्यक्ष श्री सुभाष घोडके, काँग्रेस चे नेते श्री रामानंद जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis