लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयात अण्णासाहेब पाटील यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने उद्योजकाभिमुख युवकांना महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मराठा समाजातील युवकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नोकरीच्या संधी कमी होत असताना युवकांनी आपली कौशल्ये ओळखून आवडीच्या क्षेत्रात उद्योजकता निर्माण करावी. छोट्या व्यवसायातून मोठे उद्योजक घडू शकतात, ज्यामुळे व्यक्ती, कुटुंब, राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis