लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के
लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। मागील चार दिवसांत लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सौम्य भूकंपाचे तीन धक्के नोंदविण्यात आले आहेत. घटना तपशील : दिनांक 23.09.2025, रात्री 08:13 वाजता ठिकाण: मुरुड अकोला परिसर, तालुका लातूर तीव्रता: 2.3 रिश्टर स्केल
लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के


लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

मागील चार दिवसांत लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सौम्य भूकंपाचे तीन धक्के नोंदविण्यात आले आहेत.

घटना तपशील :

दिनांक 23.09.2025, रात्री 08:13 वाजता

ठिकाण: मुरुड अकोला परिसर, तालुका लातूर

तीव्रता: 2.3 रिश्टर स्केल

खोली: 5 किमी

दिनांक 24.09.2025, रात्री 09:23 वाजता

ठिकाण: मौजे हासोरी, बडूर, उस्तुरी, तालुका निलंगा

तीव्रता: 2.4 रिश्टर स्केल (राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, नवी दिल्ली यांचेकडून पुष्टी) दिनांक 26.09.2025, सकाळी 06:30 वाजता

ठिकाण: मौजे बोरवटी, तालुका लातूर

तीव्रता: 2.2 रिश्टर स्केल

वरील तिन्ही भूकंप सौम्य स्वरूपाचे असून कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त नाही.

नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन :

घाबरून न जाता शांत राहावे.

अफवा पसरवू नयेत किंवा विश्वास ठेवू नयेत.

. प्रशासनाकडून दिलेल्या अधिकृत माहितीलाच अनुसरावे.

कच्ची घरे / जुनी इमारती यामध्ये वास्तव्य असल्यास सुरक्षित पक्क्या घरात किंवा मोकळ्या जागेत तात्पुरता आसरा घ्यावा.

घरात असल्यास मजबूत फर्निचरखाली आश्रय घ्यावा.

भूकंपानंतर गॅस, वीज, पाणी यांच्या लाईनची तपासणी करावी व नुकसान असल्यास तात्काळ कळवावे.

जखमी व्यक्तींना मदत करून सुरक्षित स्थळी हलवावे.

घाबरून घरातून धावपळ करू नये.

खिडक्या, काचेच्या वस्तू व भिंतीलगत उभे राहू नये.

सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश वा अफवांवर विश्वास ठेवू नये.

कमकुवत, ढासळत्या अवस्थेतील इमारतीमध्ये वास्तव्य करू नये.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर

नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेची काळजी घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande