लातूरमध्ये कापूस शेतकऱ्यांसाठी सीसीआयची पूर्व-नोंदणी सुविधा
लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (सीसीआय) यंदाच्या 2025-26 कापूस हंगामासाठी किमान समर्थन किंमत (एमएसपी) योजने अंतर्गत कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना स्वयंआधारित पूर्व-नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. ही नोंदणी ‘कपास किसन’
लातूरमध्ये कापूस शेतकऱ्यांसाठी सीसीआयची पूर्व-नोंदणी सुविधा


लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (सीसीआय) यंदाच्या 2025-26 कापूस हंगामासाठी किमान समर्थन किंमत (एमएसपी) योजने अंतर्गत कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना स्वयंआधारित पूर्व-नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. ही नोंदणी ‘कपास किसन’ मोबाईल ॲपद्वारे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी कपास किसन ॲपद्वारे वेळेवर नोंदणी करणे बंधनकारक असून, त्यासाठी 2025-26 च्या कापूस पेरणी क्षेत्राचा तपशील, नवीनतम ऑनलाईन सातबारा आणि आठ अ उतारा अपलोड करावा लागेल. नोंदणीनंतर, संबंधित डेटा रेव्ह्यू प्रमाणित एक्सटेंशन अथॉरिटीद्वारे प्रमाणित करून राज्य सरकारच्या प्राधिकरणाकडून मंजूर करणे आवश्यक आहे.

कापूस खरेदी केंद्रांवर गर्दी आणि रांगा टाळण्यासाठी सीसीआयने स्लॉट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. कपास किसन ॲपद्वारे स्लॉट बुक केलेले नोंदणीकृत शेतकरीच एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी पात्र ठरतील. लातूर जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande