लातूरमध्ये पीएम यशस्वी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन
लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। लातूरमध्ये पीएम यशस्वी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी स्टुडंट अंतर्गत पीएम यशस्वी – आरईजी ईजी योजनेच्या प्रभा
लातूरमध्ये पीएम यशस्वी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन


लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

लातूरमध्ये पीएम यशस्वी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी स्टुडंट अंतर्गत पीएम यशस्वी – आरईजी ईजी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लातूर जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याकरिता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज सादर करावेत. या योजनेंतर्गत 100 टक्के पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर भरून घेण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक अभय अटकळ यांनी दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande