रत्नागिरी : विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी दिव्यांगांसाठी आधार कार्ड
रत्नागिरी, 26 सप्टेंबर, (हिं. स.) : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी विशेष आधार कार्ड शिबिर शनिवारी, दि. २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींचे आधार कार्ड
रत्नागिरी : विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी दिव्यांगांसाठी आधार कार्ड


रत्नागिरी, 26 सप्टेंबर, (हिं. स.) : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी विशेष आधार कार्ड शिबिर शनिवारी, दि. २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तींचे आधार कार्ड काढण्यासाठी रत्नागिरी तहसीलदार कार्यालयात सकाळी 11 ते 4 या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जे दिव्यांग व्यक्ती किंवा बालके अजूनही आधार कार्डपासून वंचित आहेत, त्यांचे आधार कार्ड नोंदणी करण्यात येणार आहेत. या शिबिराला येताना खालील कागदपत्रे सोबत आणावीत. 18 वर्षांखालील मुलांसाठी क्यूआर कोडअसलेला जन्मदाखला, दिव्यांग बालकाचे आई किंवा वडील त्यांच्या आधारकार्डसह स्वतः उपस्थिती असणे आवश्यक,

18 वर्षांवरील व्यक्तींसाठी मतदान ओळखपत्र.

या शिबिरात दिव्यांग व्यक्तीचे आधार कार्ड अपडेट करणे,आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक करणे, आधार कार्डला लिंक मोबाइल नंबर बदलणे, इत्यादी सेवा उपलब्ध असतील. याकरिता स्वतः दिव्यांग व्यक्ती शिबिराच्या ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे, असे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालिका श्रीमती सुरेखा पाथरे यांनी कळविले आहे.ज्या दिव्यांग व्यक्तींनी अगोदर आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला असेल त्यांनी कृपया सोबत अगोदरच्या आधार पावत्या आणाव्यात.अधिक माहितीकरिता जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, रत्नागिरी (9834440200) किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी (8591903608) यांच्याशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande