छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे २०२६ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पैठण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत सुरळीत आयोजनासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कुंभमेळ्याच्या सुरक्षिततेसाठी पोलिस व सुरक्षा दलांची तयारी, सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय सुविधा, वाहतूक व रस्त्यांचे व्यवस्थापन, निवास व अन्नसुविधा, आपत्ती व्यवस्थापन व आपत्कालीन उपाययोजना याबाबत आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis