पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स प्राधान्याने उपलब्ध करून द्यावेत - तटकरे
छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स प्राधान्याने उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिले आहेत. बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव, ब
पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स प्राधान्याने उपलब्ध करून द्यावेत - तटकरे


छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स प्राधान्याने उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिले आहेत.

बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्ह्यांतील बहुतांश भाग अतिवृष्टीने बाधित आहे. या संकटकाळात महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा पुरवणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या ३% महिला व बालकल्याण निधीतून पूरग्रस्त भागातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांना विनंती केली आहे.

पूरग्रस्त भागातील महिलांच्या आरोग्यासाठी या विनंतीचा सकारात्मक विचार होऊन लवकरात लवकर कार्यवाही होईल हा मला विश्वास आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande