मुख्यमंत्री फडणवीस उद्या धुळ्यात; ‘हे’ मंत्री राहणार उपस्थित
धुळे, 26 सप्टेंबर, (हिं.स.) - माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने उद्या दि. २७ रोजी धुळ्यात अभिवादन आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यास मुख्यमंत्री दे
मुख्यमंत्री फडणवीस उद्या धुळ्यात; ‘हे’ मंत्री राहणार उपस्थित


धुळे, 26 सप्टेंबर, (हिं.स.) - माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने उद्या दि. २७ रोजी धुळ्यात अभिवादन आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी राज्य मंत्री मंडळातील विविध खात्याचे मंत्री तसेच आजी-माजी आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत. राजकारणात महाराष्ट्राच्या आपल्या प्रभावी कार्याने राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त धुळ्यात शनिवार दि. २७ रोजी दुपारी साडे बारा वाजता हा अभिवादन आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande