नांदेड - महाविस्तार एआय ॲपचा वापर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
नांदेड, 26 सप्टेंबर (हिं.स.) शेतकऱ्यांना हवामान बदल बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय AI हे अँप लाँच केले आहे. हे कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक ॲप आहे. कृत्
नांदेड - महाविस्तार एआय ॲपचा वापर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


नांदेड, 26 सप्टेंबर (हिं.स.)

शेतकऱ्यांना हवामान बदल बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय AI हे अँप लाँच केले आहे. हे कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक ॲप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या सहाय्याने हे अँप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अँप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतीचे मार्गदर्शन करते.

महाविस्तार एआय AI अँपमधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल-टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पिकांची पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखवते. कृषि विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. ॲपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अँपमधील AI तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करुन उपाय मिळवू शकतात.

महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे . चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.तसेच महाविस्तार AI ॲपचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना देखील आहे.महाविस्तार AI ॲपचा सर्वाधिक वापर करणाऱ्या,प्रत्येक तालुक्यातील पहिल्या 3 शेतकऱ्यांना ॲप मधील लीडरबोर्डवर स्थान देण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त ॲप वापरणाऱ्या 3 शेतकऱ्यांना मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशंसा पत्र देण्यात येणार आहे तसेच राज्यस्तरावर सर्वाधिक ॲप वापरणाऱ्या 10 शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रशंसा पत्र/प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande