छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। ऑरिक सिटीच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन समारंभ व समृद्धी जोडमार्गाचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी 29 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तर सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे , उद्योग विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची या सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलिकनेर, सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड यांनी केले आहे. लोकार्पण सोहळा समृद्धी महामार्गालगत तर मुख्य सोहळा ऑरिक हॉल, ऑरिक सिटी शेंद्रा, छत्रपती संभाजीनगर येथे २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis