पाठ्यपुस्तक मंडळाची विभागीय भांडारे 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार
लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। दिनांक27 ते 30 सप्टेंबर, 2025 या कालावधीत पुस्तके व कागदाची प्रत्यक्षसाठा मोजणी होणार असल्याने या कालावधीत मंडळाची विभागीय भांडारे गोरेगाव, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील
पाठ्यपुस्तक मंडळाची विभागीय भांडारे 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार


लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

दिनांक27 ते 30 सप्टेंबर, 2025 या कालावधीत पुस्तके व कागदाची प्रत्यक्षसाठा मोजणी होणार असल्याने या कालावधीत मंडळाची विभागीय भांडारे गोरेगाव, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील सर्व व्यवहार (आवक-जावक, विक्री इत्यादी) बंद राहतील.

पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत झालेल्या सर्व मुद्रक-बांधणीकार व पुस्तक विक्रेते तसेच शैक्षणिक संस्थांना कळवण्यात आले आहे. दिनांक 27 ते 30 सप्टेंबर, 2025 या कालावधीत पुस्तके व कागदाची प्रत्यक्षसाठा मोजणी होणार असल्याने या कालावधीत मंडळाची विभागीय भांडारे गोरेगाव, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील सर्व व्यवहार (आवक-जावक, विक्री इत्यादी) बंद राहतील. तरी सर्व संबंधितांनी यांची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, पुणे पाठ्यपुस्तक मंडळ पुणे संचालक अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande