सिग्नल होणार 'स्मार्ट' पुण्यात ११०० कोटींचा आयटीएमएस प्रकल्प
पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरातील सुमारे ५०० सिग्नल जंक्शनवर ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस
सिग्नल होणार 'स्मार्ट' पुण्यात ११०० कोटींचा आयटीएमएस प्रकल्प


पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरातील सुमारे ५०० सिग्नल जंक्शनवर ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ११०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तीन महिन्यांत अंमलबजावणी सुरू होईल. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.शहरात सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेली अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) सिग्नल यंत्रणा उपलब्ध आहे. महापालिकेकडून सुमारे १०२ कोटी रुपये खर्च करून १२५ सिग्नल्स बसविण्यात आले. परंतु वाहतूक कोंडी कमी न झाल्याने ही यंत्रणा फारशी प्रभावी ठरली नाही. त्यानंतर आता पोलिस आयुक्तालयाकडून ‘आयटीएमएस’ सिग्नल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस आयुक्तअमितेश कुमार यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्तालयाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, पुढील काही महिन्यांत पुणेकरांना स्मार्ट वाहतूक व्यवस्थेचा अनुभव घेता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande