राष्ट्र सेविका समितीचे पुणे शहरात आठ पथसंचलने
पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे: राष्ट्र सेविका समितीच्या वतीने विजयादशमी निमित्त पुणे शहरातील आठ भागांमध्ये पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले आहे. हे पथसंचलन दोन टप्प्यांत पार पडणार असून, त्यात समितीच्या सेविकांचा मोठा सहभाग असणार आहे. राष्ट्र सेवि
राष्ट्र सेविका समितीचे पुणे शहरात आठ पथसंचलने


पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे: राष्ट्र सेविका समितीच्या वतीने विजयादशमी निमित्त पुणे शहरातील आठ भागांमध्ये पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले आहे. हे पथसंचलन दोन टप्प्यांत पार पडणार असून, त्यात समितीच्या सेविकांचा मोठा सहभाग असणार आहे. राष्ट्र सेविका समिती ही राष्ट्रासाठी कार्य करणारी महिलांची एक प्रमुख संघटना आहे, जी देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करते. पहिल्या टप्प्यातील संचलन: रविवार, २८ सप्टेंबर २०२५, सकाळी ८ वाजता - संभाजी भाग: वारजे येथील RMD धारीवाल कॉलेजमधून सुरू होईल. - सिंहगड भाग: वडगाव येथील मा. शरदचंद्र पवार इ-लर्निंग स्कूलमधून संचलन सुरू होईल. - येरवडा भाग: खराडी येथील झेन्सार मैदानातून संचलन निघेल. - कात्रज भाग: कात्रजमधील वंडर सिटीजवळील रामचंद्र कदम (परिट) मैदानातून संचलनाला सुरुवात होईल. - कसबा भाग: न. वि. गाडगीळ शाळेतून संचलन निघेल. - पर्वती भाग: गुलटेकडी, सैलिसबरी पार्क येथील महावीर इंग्लिश मीडियम स्कूलमधून संचलन सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यातील संचलन: रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ - लष्कर भाग: संचलन सकाळी ८.३० वा. वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था मैदानातून (जांभूळकर चौक जवळ) सुरू होईल. - विद्यापीठ भाग: हे संचलन संध्याकाळी ४.३० वा. बाणेर येथील नाना-नानी पार्कमधून सुरू होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande