नंदुरबार - ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्त विशेष मोहीम
नंदुरबार, 26 सप्टेंबर,(हिं.स.) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्ताने विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त तथा सदस्या वै.भा. हिगे यांन
नंदुरबार - ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्त विशेष मोहीम


नंदुरबार, 26 सप्टेंबर,(हिं.स.) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्ताने विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त तथा सदस्या वै.भा. हिगे यांनी कळविले आहे.

ही विशेष मोहीम 16 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत असून या सेवा पंधरवड्यात, प्रामुख्याने इयत्ता 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील सन 2025-26 मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळवण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे. तसेच मोहिमेदरम्यान, इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची तालुका व महाविद्यालयनिहाय संख्यात्मक माहिती समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येत आहे.

सीईटी (CET) देणारे तसेच डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे देखील ऑनलाईन (ONLINE) अर्ज प्राप्त करून घेतले जातील. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांसाठी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रांमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहेत. समान संधी केंद्राच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त होतील आणि या प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करून वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन समितीने केले आहे. जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी आणि सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांमध्ये परिपूर्ण अर्ज सादर करून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा व जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असेही आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्या श्रीमती हिगे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande