लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। रेणापूर मध्यम प्रकल्प रेणापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 26/09/2025 रोजी ठीक 10:45वाजता रेणापूर प्रकल्पाचे एकूण 04 द्वार हे उघडण्यात आले असून रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत एकूण 04 वक्र द्वारे 10 सेंटिमीटर ने उघडण्यात आली असून एकूण 1117.31क्यूसेक्स (35.64क्यूमेक्स ) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी. *पुरनियंत्रण कक्ष* रेणापूर मध्यम प्रकल्प
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis