इस्लामाबाद , 26 सप्टेंबर (हिं.स.)। उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात एक रस्ते अपघात घडला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील किमान ११ सदस्यांचा मृत्यू झाला आहे आणि ३ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती शुक्रवारी (दि.२६) बचाव अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात गुरुवारी उशिरा रात्री डेरा इस्माईल खान जिल्ह्यात घडला. वाहनाचे ब्रेक फेल झाल्यामुळे ते थेट दरीत कोसळले. हे वाहन झोब जिल्ह्यातून डेरा इस्माईल खानकडे निघाले होते.यावेळीच हा अपघात घडला. बचाव पथक घटनास्थळी पोहोचताच ५ महिला, १ पुरुष आणि १ बालकाचे मृतदेह, अशा एकूण ७ मृतदेह सापडले.तसेच, ३ जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले.अधिकार्यांनी याची पुष्टी केली की, अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकााच कुटुंबाचे सदस्य होते.
पाकिस्तानमध्ये याच वर्षी, जुलै महिन्यात देखील एक भीषण बस अपघात झाला होता. या अपघातात किमान ९ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ३० हून अधिक लोक जखमी झाले होते. ही बस इस्लामाबादहून लाहोरकडे निघाली होती आणि चकवाल जिल्ह्यातील बलकसारजवळ दरीत कोसळली होती.
एप्रिल महिन्यातही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अजून एक भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये महिलांनाही व बालकांसह ११ लोकांचा मृत्यू झाला होता. हा अपघात जरानवाला येथे झाला होता, जिथे एक प्रवासी बस आणि तीन चाकी वाहनात जोरदार धडक झाली. ही बस जरानवालाहून लाहोरकडे निघाली होती.
पाकिस्तानमधील खराब रस्त्यांची स्थिती,वाहतूक सुरक्षिततेबाबत जागरूकतेचा अभाव, वाहतूक नियमांची सर्रासपणे होणारी पायमल्ली या सर्व गोष्टी देशात घातक रस्ते अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode