जळगाव, 26 सप्टेंबर (हिं.स.) चोपडा शहरातील सहयोग कॉलनी, लोहिया नगर भागात सण उत्सवा निमित्ताने अंगणात रांगोळ्या काढल्या असतांना रस्त्यावर रांगोळ्या का काढल्या असा प्रश्न विचारत शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत असून त्याविरोधात महिला पुरुषांनी उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणी साठी ठिय्या आंदोलन करून तसे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की,दि.२४ रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास आम्ही सहयोग कॉलनी लोहिया नगर भागातील महिला अंगणात रांगोळ्या काढल्या असता पोलीस अधिकारी मधुकर साळवे आले आणि त्यांनी रस्त्यावर रांगोळ्या का काढता असे म्हणत शिवीगाळ करत करून धमकावले.पोलीस अधिकारी महिलांना सुरक्षा देण्यासाठी आहे की, त्यांना धमकावण्यासाठी असा सवाल निवेदनात केला आहे.सहयोग कॉलनी,लोहिया नगर भागातील शेकडो महिला पुरुषांनी धनवाडी रस्त्यावरील स्थित उप विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.निवेदनावर कुंदन महाजन,नेहा महाजन,सुनंदा महाजन,ज्योती माळी,गोकुळ माळी यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील, मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अनिल वानखेडे, सेनेचे आबा देशमुख,माजी नगरसेवक राजाराम पाटील,गजेंद्र जैस्वाल,कांतीलाल पाटील,राकेश पाटील,चंद्रशेखर पाटील,प्रवीण राखेचा, यांच्यासह असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते हजर होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर