नालासोपाऱ्यात ‘रूपांतरण यात्रे’ला प्रचंड प्रतिसाद
* सेवा भाव, आरोग्य जागरूकता आणि जीवनमूल्यांचा प्रसार नालासोपारा, २६ सप्टेंबर (हिं.स.) : आरसीएमची संपूर्ण देशभर सुरू असलेली रूपांतरण यात्रा महाराष्ट्रातील नालासोपारा येथे पोहचली. या वेळी स्थानिक नागरिक आणि संलग्न व्यक्तींनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविल
यात्रा


* सेवा भाव, आरोग्य जागरूकता आणि जीवनमूल्यांचा प्रसार

नालासोपारा, २६ सप्टेंबर (हिं.स.) : आरसीएमची संपूर्ण देशभर सुरू असलेली रूपांतरण यात्रा महाराष्ट्रातील नालासोपारा येथे पोहचली. या वेळी स्थानिक नागरिक आणि संलग्न व्यक्तींनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.

समावेशक विकासाच्या आपल्या दृष्टीकोनाचा भाग म्हणून आरसीएम नालासोपारा आणि महाराष्ट्रातील विविध समुदायांमधील लोकांना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आरसीएमच्या २५ व्या वर्धापनदिन उत्सवाचा एक भाग असलेली ही यात्रा १०० दिवसांची असून, ती १७ हजार किमी अंतर, ७५ शहरे आणि २५ भव्य कार्यक्रमांचा समावेश करते.

“नालासोपाऱ्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा आमच्या लोकाभिमुख चळवळीच्या ताकदीचे आणि आत्म्याचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक घरापर्यंत उत्तम आरोग्य, आर्थिक संधी आणि मजबूत मूल्ये पोहोचविण्याच्या आमच्या ध्येयाशी आम्ही कटिबद्ध आहोत, कारण आमचा प्रवास ‘स्वस्थ आणि विकसित भारता”कडे सुरूच आहे,” असे व्यवस्थापकीय संचालक सौरभ छाब्रा यांनी सांगितले.

“नालासोपाऱ्यातील रूपांतरण यात्रा हा या दीर्घ प्रवासातील एक टप्पा आहे. १७,००० किमीच्या या प्रवासात पुढे जाताना आम्ही प्रत्येक महिलेला सन्मान, सामर्थ्य आणि आत्मविश्वासाने जगण्याची संधी देण्यास कटिबद्ध आहोत, जेणेकरून स्त्रिया देखील पुरुषांसोबत समानतेने ‘नवीन भारत’ घडविण्यात योगदान देऊ शकतील,” असे व्यवस्थापकीय संचालक प्रियंका अगरवाल यांनी म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande