पुणे - सह्याद्री रुग्णालयाच्या यकृत प्रत्यारोपण प्रकरणाची समितीकडून चौकशी
पुणे, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। यकृत प्रत्यारोपणादरम्यान दांपत्याच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या चौकशी समितीने डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयाला गुरुवारी भेट देऊन कागदपत्रांची व रुग्णालयाची चौकशी केली. जागतिक कीर्तीचे यकृत प्रत
पुणे - सह्याद्री रुग्णालयाच्या यकृत प्रत्यारोपण प्रकरणाची समितीकडून चौकशी


पुणे, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। यकृत प्रत्यारोपणादरम्यान दांपत्याच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या चौकशी समितीने डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयाला गुरुवारी भेट देऊन कागदपत्रांची व रुग्णालयाची चौकशी केली. जागतिक कीर्तीचे यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. मोहम्मद रेला यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, डॉ. रेला व इतर तज्ज्ञांनी ही भेट दिली.

पती बापू कोमकर यांना यकृताचा काही भाग दान करणाऱ्या त्यांची पत्नी कामिनी कोमकर या दोघांचा मृत्यू ‘सह्याद्री’मध्ये ऑगस्टमध्ये झाला. याबाबत चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या आठ सदस्यीय समितीने भेट देत माहिती घेतली.या घटनेनंतर रुग्णालयाचा यकृत प्रत्यारोपण परवाना स्थगित करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. मोहम्मद रेला यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राम प्रभू (यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक, केईएम मुंबई), डॉ. राहुल पंडित (आयसीयू तज्ज्ञ व इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे माजी उपाध्यक्ष), डॉ. वसंत नागवेकर (नॅशनल इन्फेक्शस डिसीजेस सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव), डॉ. विजय व्होरा (लिव्हर ट्रान्सप्लांट अॅनेस्थेशिया सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य), डॉ. आकाश शुक्ला (हेपॅटोलॉजिस्ट व रोट्टो-सोट्टो महाराष्ट्र, अध्यक्ष) आणि डॉ. पद्मसेन रणबागळे (शल्यचिकित्सक, ससून रुग्णालय) व आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande