छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
जागतिक केटरर्स’डे निमित्त छत्रपती संभाजीनगर, केटरिंग असोसिएशनच्या वतीने भव्य व्यवसायिक प्रदर्शन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. हा एक अद्वितीय उपक्रम होता, ज्यामध्ये व्यवसाय क्षेत्रातील उत्कृष्टतेला साजेशी व्यासपीठे निर्माण झाली.
हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी विविध व्यावसायिक उत्पादनाचे सादरीकरण करण्यात आले. जागतिक केटरर्स’डेच्या या खास निमित्ताने व्यवसायिकांच्या सर्जनशीलतेला व नवकल्पनांना संपूर्ण व्यासपीठ मिळाले.
जागतिक केटरर्स’डे हा व्यवसायिकांना एकत्र आणणारा व त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून केटरिंग उद्योगाच्या विकासास चालना मिळून उद्योगधंद्यांना बळकटी मिळेल.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis