रत्नागिरी, 26 सप्टेंबर, (हिं. स.) : पंचायत समिती सभापतीपदाकरिता नागरिकांचा मागासप्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी येत्या 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीची पदे पद्धतीने आरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी दालनात 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजित केली आहे, असे प्र. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्या एका प्राधिकृत प्रतिनिधीस पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाच्या सभेस उपस्थित राहता येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी