शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी ट्रम्प यांची घेतली भेट
वॉशिंग्टन, 26 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. शहबाज शरीफ यांचा हा व्हाइट हाऊसचा पहिलाच दौरा होता. सध्या शरीफ हे संयुक्त र
शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची घेतली भेट


वॉशिंग्टन, 26 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. शहबाज शरीफ यांचा हा व्हाइट हाऊसचा पहिलाच दौरा होता. सध्या शरीफ हे संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) 80व्या सत्रात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्क येथे आले आहेत आणि ते आज, शुक्रवारी जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत.या बैठकीत शहबाज यांच्या सोबत फील्ड मार्शल असीम मुनीर देखील उपस्थित होते. तसेच यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ देखील उपस्थित होते.

2019 मध्ये इमरान खान यांच्या भेटीनंतर, हा पहिलाच प्रसंग होता जेव्हा एखाद्या पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्हाइट हाऊसला भेट दिली होती. शहबाज शरीफ हे न्यूयॉर्कहून वॉशिंग्टनमध्ये एका छोट्या भेटीसाठी आले होते. ते व्हाइट हाऊसमध्ये दुपारी 4:52 वाजता दाखल झाले, जिथे वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या वेळी ट्रम्प हे काही कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या करत होते आणि पत्रकारांशी संवाद साधत होते.

शहबाज शरीफ आणि असीम मुनीर व्हाइट हाऊस पोहोचल्यावर ट्रम्प म्हणाले, “आपण काही महान नेत्यांची वाट पाहतो आहोत ते म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि फील्ड मार्शल. फील्ड मार्शल अत्यंत योग्य व्यक्ती आहेत आणि पंतप्रधान देखील. कदाचित ते पोहोचलेही असतील. मला खात्री नाही, कारण आपल्याला उशीर झाला आहे. कदाचित ते ओव्हल ऑफिसमध्येच असतील.”

रिपोर्टनुसार, त्या वेळी खरंच शरीफ आणि मुनीर बाजूच्या खोलीत उपस्थित होते, पण तरीही ट्रम्प यांनी त्यांना बराच वेळ वाट पाहायला लावले. शहबाज शरीफ यांच्या गाड्यांचा ताफा संध्याकाळी 6:18 वाजता व्हाइट हाऊस मधून रवाना झाला.

याआधी, मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये यूएनजीए सत्राच्या दरम्यान, शहबाज शरीफ आणि ट्रम्प यांची एक बहुपक्षीय बैठकीदरम्यान भेट झाली होती, ज्यात अरब देशांचे नेते, तसेच मिसर, इंडोनेशिया, कतार, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान यांचे नेते देखील सहभागी होते.

ट्रम्प यांनी वारंवार दावा केला आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातीलसंघर्षात मध्यस्थी करून तो थांबवण्याचे काम केले. यूएनजीए मध्ये जागतिक नेत्यांना संबोधित करताना देखील त्यांनी हा दावा पुन्हा केला. पाकिस्तानने ट्रम्प यांचे नोबेल शांती पुरस्कारासाठी नामांकन (2026) केले आहे, जेणेकरून “भारत-पाकिस्तान संकटाच्या काळात त्यांच्या निर्णायक कूटनीतिक हस्तक्षेप आणि नेतृत्वाची” दखल घेतली जावी.

पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाला आहे, ज्याअंतर्गत पाकिस्तानी आयातीवर 19 टक्के टॅरिफ लागू करण्यात आला आहे आणि अमेरिका पाकिस्तानच्या तेल साठ्यांच्या विकासासाठी मदत करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande