छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांच्य उपस्थितीमध्ये पैठण तालुक्यातील महिला शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली.
पैठण तालुक्यातील पाचोड येथे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या पुढाकाराने पैठण तालुक्यातील महिला शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली.
महिला शिक्षकांची गुणवत्ता वाढवणे आणि सक्षम पिढी तयार करणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. यामध्ये नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षकांचे नेतृत्व कौशल्य, अशा विविध विषयांवर संवाद आणि चर्चा झाली. यावेळी उपस्थित महिला शिक्षकांना मार्गदर्शन करून नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis