नंदुरबार, 26 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती सर्वंकष माहितीकोष- 2025 यामध्ये 01 जुलै 2025 या दिनांकाच्या संदर्भाने अनुसरुन अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी उपसंचालक वि.गु. धनगर यांनी केले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार शासकीय सर्व कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. यात नियमित कर्मचारी, कार्यव्यवहार आस्थापनेवरील कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी , अंशकालीन कर्मचारी, मानसेवी कर्मचारी आणि तदर्थ तत्त्वावर नेमणूक केलेले कर्मचारी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे काम हाताळत आहे. संदर्भ 01 जुलै 2025 धरून कर्मचाऱ्यांचे नाव, जन्मदिनांक, आधार क्रमांक, वेतन तपशील, इतर आवश्यक माहिती तसेच स्थायी आणि तात्कालिक माहिती गोळा केली जाईल. या डेटाबेस अद्ययावतीकरणासाठी वेळापत्रक दिलेले असून या वेळापत्रकानुसार आहरण व संवितरण अधिकारी यांनी निर्धारित वेळेत माहिती अद्ययावत करावी. माहिती अद्ययावत न केल्यास, माहे नोव्हेंबर 2025 आणि माहे फेब्रूवारी, 2026 चे वेतन देयके कोषागारात स्विकारले जाणार नाहीत. माहिती https://mahades.maharashtra.gov.in/CGE/home.do या संकेतस्थळावर अद्ययावत करावी तसेच सूचना संच व माहिती कशी भरावी याचा Flow Chart देखील DDO Login वर उपलब्ध करून दिलेला आहे, त्यानुसारच माहिती भरण्यात यावी. लॉगींन करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-2024 मधील emdb२०२० हा पासवर्ड ही आज्ञावली वापरण्यासाठी कायम ठेवण्यात आलेला असून ज्या कार्यालयांची नव्याने निर्मिती झाली आहे, त्यांनी लॉगिन आयडी (ID) व पासवर्ड (Password) उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हा सांख्यकी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक माहिती सादर करावी. या प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02564-210044 अथवा सांख्यिकी सहाय्यक गो. सा. लहरे, मोबाईल क्रमांक 7588750503 यांच्याशी संपर्क साधवा असेही उपसंचालक धनगर यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर