सोलापूर, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर आजपासून पुन्हा वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सकाळपासूनच सोलापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. पंढरपूरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.पंढरपूरमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज आहे. यामुळे सीना नदीला पुन्हा पूर येण्याचा धोका आहे. अतिवृष्टी झाली तर सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. यामुळे सीना नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढेल. परिणामी पुन्हा भीषण पूरस्थितीचा सामना सीना नदीकाठच्या लोकांना करावा लागेल. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी काठच्या गावांमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड