सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श  - जयकुमार गोरे
सोलापूर, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदे सोलापूर चा वतीने 44 कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह प
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श  - जयकुमार गोरे


सोलापूर, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदे सोलापूर चा वतीने 44 कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी ज्ञानदेव घुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले प्रमुख उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले , राज्यात १०० दिवस कार्यक्रम अंतर्गत अनुकंपा पदभरती पारदर्शक पण राबविण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेने यात आघाडी घेत सर्व अनुकंपा अंतर्गत १०० टक्के जागा भरून उत्कृष्ठ काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या सिईओ हे जर प्रशासक असतील तर किती चांगले प्रकारे काम करू शकतात याचे हे आदर्श उदाहरण आहे. समुपदेशन करून पदस्थापना देणेत आली ही बाब कौतुक करणारी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande