परभणी : तुळजा भवानी नवरात्र महोत्सवात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
परभणी, 26 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील रामकृष्ण नगर येथे श्री तुळजा भवानी नवरात्र महोत्सव मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडत असून महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रभागातील महिलांची
रामकृष्ण नगर येथे श्री तुळजा भवानी नवरात्र महोत्सवात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग


परभणी, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

शहरातील रामकृष्ण नगर येथे श्री तुळजा भवानी नवरात्र महोत्सव मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडत असून महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रभागातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती व सहभाग या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.

नवरात्रोत्सवाच्या पारंपरिक गडद वातावरणात सकाळी कुमारी पूजन, महाआरती, दुर्गा सप्तशती पारायण यांसह विविध धार्मिक विधी पार पडले. महिलांनी देवीच्या आराधनेसाठी सामूहिकरित्या गरबा व दांडिया सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.

महिला मंडळाच्या वतीने आयोजित भजन, कीर्तन, हरिपाठ यांसारख्या उपक्रमांमध्ये महिलांसह लहान मुलींचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. दररोज देवीच्या महाआरतीसाठी परिसरातील महिलांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून प्रभागातील भक्तगण मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेत आहेत. या प्रसंगी सामाजिक ऐक्य व स्त्रीशक्तीचा जागर अधोरेखित झाला. महिला मंडळाच्या कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी महोत्सवाचे उत्तम नियोजन करून भक्तांना सुखद अनुभव दिला.

रामकृष्ण नगर परिसरात नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आनंद, उत्साह आणि भक्तीमय वातावरण पसरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande