अमरावती, 26 सप्टेंबर (हिं.स.) ओट चोरी ओट चोरी म्हणणारे विरोधक आता ‘अकला चोरीला’ गेल्यासारखे बोलत आहेत, अशा शब्दांत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना फुंडकर म्हणाले की, शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना, विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून मैदानात उतरावं. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ताकदीने उभं आहे. मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ फिल्डवर आहे. नुकसानीबाबत २२०० कोटींचा जीआर निघालेला आहे आणि पुढील नुकसानीसाठीही निर्णय घेतले जातील.
रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देतानाफुंडकर म्हणाले, नैसर्गिक आपत्ती कोणाच्या बोलावण्यानं येत नाही. अशा वेळी राजकारण न करता एकत्र काम करण्याची गरज आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे कधीतरी घराबाहेर पडले पाहिजेत. जर ते रस्त्यावर आले तर ते चांगलंच आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी कधीही विधानभवनात किंवा जनतेत सहभाग घेतला नाही. आता तरी ते जनतेच्या भेटीसाठी रस्त्यावर येत असल्याचं दिसतं, हे स्वागतार्ह आहे, असे टोले त्यांनी लगावले.
प्रदेशाध्यक्षांच्या स्वागतावर स्पष्टीकरण
दुष्काळी परिस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे बँड-बाजाने स्वागत केल्याबाबत विचारता, फुंडकर म्हणाले, हे स्वागत प्रदेशाध्यक्षांनी आदेश देऊन केलं नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्साहातून ते केलं असेल. अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जातील.असे हि ते म्हणालेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी