वॉशिंग्टन , 26 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे टिकटॉकसोबत एक महत्त्वाचा करार झाला आहे. या आदेशानंतर टिकटॉक आता अमेरिकी मालकी आणि नियंत्रणाखाली येणार आहे. ट्रम्प यांनी सांगितले की 20 सप्टेंबर रोजी चीनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती आणि त्या चर्चेत टिकटॉक करार हा मुख्य मुद्दा होता. ट्रम्प म्हणाले,“माझी शी जिनपिंग यांच्याशी चांगली चर्चा झाली. मी त्यांचा सन्मान करतो आणि आशा आहे की तेही माझा सन्मान करतात. आम्ही टिकटॉकबाबत चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला पुढे जाण्याची परवानगी दिली.” ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, आता टिकटॉक अमेरिकन गुंतवणूकदार आणि कंपन्यांच्या हातात असेल, ज्यामुळे डेटा गोपनीयता आणि सुरक्षा याबाबतच्या चिंता दूर होतील. ते म्हणाले, “हा अॅप आता उत्कृष्ट अमेरिकी कंपन्यांकडून चालवला जाईल. अनेक तरुणांना हा करार पूर्ण व्हावा असे वाटत होते आणि आम्ही ते शक्य करून दाखवले.” ट्रम्प यांनी सांगितले की, ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन आणि त्यांची कंपनी टिकटॉकच्या सुरक्षेची जबाबदारी घेतील. ते पुढे म्हणाले, “ओरेकल आणि इतर अमेरिकी गुंतवणूकदार हा अॅप चालवतील. ते अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सुनिश्चित करतील.” या आदेशात नमूद करण्यात आले आहे की टिकटॉकचा रिकमेन्डेशन अल्गोरिदम (कन्टेंट सुचवण्याची प्रणाली) आता अमेरिकेच्या सुरक्षा भागीदारांच्या देखरेखीखाली पुन्हा कार्यान्वित केला जाईल. ट्रम्प यांनी जाहीर केले की या डीलमध्ये मायकेल डेल, रुपर्ट मर्डोक यांच्यासारखे 4-5 जागतिक दर्जाचे गुंतवणूकदार सहभागी असतील. ओरेकल आणि सिल्व्हर लेक मिळून सुमारे 50% हिस्सेदारी घेतील. बाइटडान्सचे सध्याचे काही शेअरधारक मिळून सुमारे 30% हिस्सा ठेवतील. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी सांगितले की या करारामुळे अॅप अमेरिका मध्ये सुरू राहील आणि अमेरिकी वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित राहील. त्यांनी पुढे स्पष्ट केले, “चीनकडून थोडा विरोध झाला होता, पण आमचा उद्देश स्पष्ट होता, टिकटॉक चालू ठेवणे आणि अमेरिकी नागरिकांचा डेटा सुरक्षित ठेवणे.” रिपब्लिकन पक्षाचे काही खासदारांनी मागणी केली आहे की या कराराची अधिक माहिती सार्वजनिक केली जावी, जेणेकरून हे निश्चित करता येईल की चीनचा प्रभाव पूर्णपणे संपला आहे की नाही.खासदार ब्रेट गुथरी म्हणाले, “आपल्याला हे सुनिश्चित करावं लागेल की हे करार अमेरिकन वापरकर्त्यांना चीनशी संबंधित कोणत्याही नियंत्रण किंवा प्रभावापासून पूर्णतः वाचवतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode