नांदेड - ऊस पीक परिसंवाद व कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न
नांदेड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात ऊस पीक परिसंवाद व कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न झाला. संस्कृति संवर्धन मंडळाच्या कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि व्हीपीके उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पीक परि
अ


नांदेड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात ऊस पीक परिसंवाद व कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न झाला.

संस्कृति संवर्धन मंडळाच्या कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि व्हीपीके उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पीक परिसंवाद व AI आधारित ऊस प्रक्षेत्र भेट कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन श्री. प्रमोद देशमुख होते, तर प्रमुख उपस्थिती व्हीपीके समूहाचे अध्यक्ष श्री. मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांची होती.

परिसंवादात ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे उत्पादन वाढ व निविष्ठा खर्चात कशी बचत करता येते, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय ऊस पिकासाठी पंचसूत्री बाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. व्हीपीके उद्योग समूहाने ऊस व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध विविध योजनांची माहिती दिली व शाश्वत ऊस खरेदीची हमी दिली. कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस प्रक्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून: व्हीपीके उद्योग समूहाचे जनरल मॅनेजर श्री. मनोज गाडेगावकर, ऊस विकास अधिकारी श्री. एस. जे. सावंत व श्री पडवळे व कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. कपिल इंगळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असा संदेश देण्यात आला की, AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा ऊस शेतीत प्रभावी वापर करावा व दुग्ध व्यवसायाची जोड देऊन शाश्वत उत्पन्नाचा मार्ग स्वीकारावा, तरच शेतीत स्थैर्य आणि टिकाव साधता येईल. या कार्यक्रमात सगरोळी व पंचक्रोशीतील 200 हून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande