त्र्यंबकेश्वर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर भागात हिवाळी पक्षांचे आगमन होऊ लागले आहे. मेटघर किल्ला येथे कद्र्या पोट्या ( साळुंकी प्रमाणे दिसणारा पक्षी) या पक्षाचे नुकतेच मेटघर किल्ला हत्ती दरवाजा या भागात आगमन झाले आहे.
हिवाळ्यासाठी असे पक्षी सुरुवातीला या भागात येतात. नांदगाव कोहळी परिसरात देखील हिवाळे पक्षी आता येतील. दरम्यान यंदा प्रथमच येथील निळ पर्वतावर प्रथमच विविध प्रकारच्या तीन चार पक्षांचे आगमन झाले आहे. असे पक्षी प्रथमच दृष्टी पडले की माहिती येथे नियमित जाणाऱ्या भक्तांनी दिली. यांतील पक्षाचे फोटो. डोक्यावर विशिष्ट तुरा असलेला पक्षी देखील इथे दिसू लागला आहे. भारद्वाज पक्षी सारखे दिसणारे पक्षी देखील आले आहेत दरम्यान पाऊसाळ्यात येणाऱ्या पक्ष्यांनी इथून उडान भरले असून असे पक्षी आता दुसरीकडे गेले आहे त्यांनी स्थलांतर केले आहे. येथील गौतम तलाव गंगासागर तलाव येथे काही प्रमाणात पानकोंबड्या आल्या होत्या. त्या देखील आता कमी झाले आहेत परंतु पान कोंबड्यांनी दोन अडीच महिन्यात छोट्या माशांवर ताव मारला असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. दरम्यान येथील पंचायत समिती तसेच वाचनालय येथील झाडांवर बगळे व पान कावळे या पक्षांची घरटे आणि पिले दूरवरून पर्यटकांचे निसर्ग प्रेमी पक्षी प्रेमी यांचे लक्ष वेधून घेतात. पंचायत समितीवर पांढरे बगळे आदीच आगमन होऊ लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV