रत्नागिरी : हुतात्मा जवानांच्या पत्नी, अवलंबितांना शेतीयोग्य जमीन वाटपासंबंधी निर्णय
रत्नागिरी, 26 सप्टेंबर, (हिं. स.) : युद्धात किंवा युद्धजन्य परिस्थितीत किंवा कोणत्याही लष्करी कार्यवाहीमध्ये वीरमरण आलेल्या राज्याचे अधिवासी असणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नी, अवलंबितांना शेती योग्य जमीन वाटपासंबंधी त्यांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत जिल्ह
रत्नागिरी : हुतात्मा जवानांच्या पत्नी, अवलंबितांना शेतीयोग्य जमीन वाटपासंबंधी निर्णय


रत्नागिरी, 26 सप्टेंबर, (हिं. स.) : युद्धात किंवा युद्धजन्य परिस्थितीत किंवा कोणत्याही लष्करी कार्यवाहीमध्ये वीरमरण आलेल्या राज्याचे अधिवासी असणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नी, अवलंबितांना शेती योग्य जमीन वाटपासंबंधी त्यांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीला एअर मार्शल एच. एन. भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधार ताटे, नायब महसूल अधिकारी श्री. भिसे, माजी सैनिक प्रफुल्ल रेडीज, तुषार हरवडे तसेच वीरनारी, वीरमाता, वीरपिता व अवलंबित उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना अहवाल ताबडतोब सादर करण्याबाबत सूचना दिल्या व सर्व प्रकरणे सेवा पंधरवड्यामध्ये निकाली काढण्याबाबत सांगितले. तसेच एकत्रित व वैयक्तिक जमीन देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande