सोलापूर - पूरग्रस्त विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार खराब; साहित्य गेले वाहून
सोलापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।सीना नदीला महापूर आल्याने जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७२७ पैकी बार्शी, करमाळा, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व मोहोळ या तालुक्यातील ४३१ शाळांमधील साहित्याचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठीचा शालेय पोषण आहार, संगण
सोलापूर - पूरग्रस्त विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार खराब; साहित्य गेले वाहून


सोलापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।सीना नदीला महापूर आल्याने जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७२७ पैकी बार्शी, करमाळा, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व मोहोळ या तालुक्यातील ४३१ शाळांमधील साहित्याचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठीचा शालेय पोषण आहार, संगणक, पुस्तके पाण्यात वाहून गेली आहेत. या तालुक्यातील १८१ अंगणवाड्यांचीही अशीच दुरवस्था झाली आहे.सीना-कोळेगाव, चांदणी, खासापूर या धरणातून व भोगावती नदीतून सव्वादोन लाख क्युसेकचा विसर्ग सोडल्याने सीना नदीला महापूर आला होता. नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने २३ व २४ सप्टेंबरला शाळांना सुट्टी देण्यात आली होती. शाळांमध्ये देखील पाणी होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेल्या माहितीनुसार सहा तालुक्यांतील ४३१ शाळांना महापुराचा फटका बसला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande