पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, कारागीर तसेच बचतगटांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. एस. के. केंजळे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगांकरिता कर्ज मर्यादा १०० लाख रुपये, सेवा उद्योग व कृषीपूर्वक उद्योगाकरिता कर्ज मर्यादा ५० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.अर्जदार स्थानिक रहिवासी व कोणतेही स्थायी उत्पन्न नसलेला असावा. वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे. केवळ नवीन उद्योजक, कारागीर, संस्था व बचतगट योजनेकरिता पात्र राहतील. १० लाखांवरील प्रकल्पासाठी व ५ लाखांवरील सेवा/कृषीपूरक उद्योगाकरिता अर्जदार किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक. एका कुटुंबातील (पती-पत्नी) फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल.अर्ज करतेवेळी आधारकार्ड, शैक्षणिक दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ग्रामसेवकाचा लोकसंख्येचा दाखला, प्रकल्प अहवाल व इंग्रजीतील अंडरटेकिंग फॉर्म, पॅन कार्ड, गुणपत्रिका, अर्जदाराचे छायाचित्र जोडावे. इच्छुकांनी maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना KVIB एजन्सीची निवड करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय-२४ब, पुणे-मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरीसमोर, एस.टी. स्टॅण्ड शेजारी, खडकी येथे संपर्क साधावा.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु