पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यात १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ११ ते २ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, येरवडा, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण, पुणे विभाग, पुणे तसेच श्री. विशाल लोंढे, सहायक आयुक्त समाजकल्याण, पुणे उपस्थित राहणार आहेत. प्रादेशिक उपायुक्त व सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या सर्व संघ- संघटना या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान व गौरव करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन सामाजिक न्याय भवनामध्ये करण्यात आले आहे. असे विशाल लोंढे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे. -
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु