औंध टपाल कार्यालयात पार्सल पॅकेजिंग सुविधा
पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। औंध टपाल कार्यालयात आता अत्याधुनिक पार्सल पॅकेजिंग युनिटची सेवा उपलब्ध झाली आहे. औंध आणि बाणेर परिसरातील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांना परदेशात पार्सल पाठवताना दर्जेदार पॅकिंगची गरज भासत होती. याआधी ही सुविधा उपलब्ध न
औंध टपाल कार्यालयात पार्सल पॅकेजिंग सुविधा


पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। औंध टपाल कार्यालयात आता अत्याधुनिक पार्सल पॅकेजिंग युनिटची सेवा उपलब्ध झाली आहे. औंध आणि बाणेर परिसरातील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांना परदेशात पार्सल पाठवताना दर्जेदार पॅकिंगची गरज भासत होती. याआधी ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना पुणे प्रधान डाकघर, पर्वतीपर्यंत जावे लागत होते.भारतीय टपाल खात्याच्या पुणे शहर पश्चिम विभागाने या गरजेला प्रतिसाद देत औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहाजवळील औंध टपाल कार्यालयात हे युनिट सुरू केले आहे. या युनिटचे उद्‍घाटन पोस्टल सर्व्हिसेस पुणे क्षेत्राचे संचालक अभिजित बनसोडे यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे शहर पश्चिम विभागाचे प्रवर अधीक्षक नितीन येवला, व्यवसाय विकास गटाचे व्यवस्थापक योगेश वाळुंजकर आदी उपस्थित होते.ही सुविधा देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पार्सल वितरणात नागरिकांसाठी उपलब्ध असेल. आगामी दिवाळी सणासाठी, नागरिक, ई-कॉमर्स व्यावसायिक आणि लघु व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पुणे शहर पश्चिम विभागाचे प्रवर अधीक्षक नितीन येवला यांनी आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande