कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांचे मानधन दिवाळीपूर्वी अदा करावे - डॉ. भोयर
मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा आणि मानव विकास कार्यक्रमांतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना राज्यात राबविण्यात येत आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांचे मानधन नियोजन विभागामार्फत अदा करण्यात येते. ह
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांचे मानधन दिवाळीपूर्वी अदा करावे - डॉ. भोयर


मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा आणि मानव विकास कार्यक्रमांतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना राज्यात राबविण्यात येत आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांचे मानधन नियोजन विभागामार्फत अदा करण्यात येते. हे मानधन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे, असे आदेश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. तसेच, राज्य शासनाच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेंतर्गत असलेल्या शाळा आदर्श करण्याचेही त्यांनी सूचित केले.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आमदार मनीषा कायंदे, समग्र शिक्षण राज्य प्रकल्पाचे संचालक संजय यादव, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, उपसंचालक राजेश कंकाळ, नियोजन विभागाचे उपसचिव मनीषा राणे उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, केंद्राच्या समग्र शिक्षा अंतर्गत असलेल्या विद्यालयातील शिक्षक आणि राज्य शासनाच्या योजनेतील विद्यालयातील शिक्षकांचे मानधन समान करण्यात यावे. यातील तफावत दूर करावी. यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा. समग्र शिक्षा व मानव विकास कार्यक्रमांतर्गत कार्यरत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांवर एकछत्री प्रशासकीय नियंत्रण असावे. राज्याच्या योजनेतील विद्यालयांचे समग्र शिक्षामध्ये समावेशन करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा.

या दोन्ही योजनांमध्ये निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थिनींच्या भोजन, निवासाच्या सुविधा दर्जेदार असाव्यात. या निवासी विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असेही राज्यमंत्री भोयर यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande