परभणी, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, बंधाऱ्याची पाणी पातळी ३९५.३० मीटरवर पोहोचली असून १६ ही दरवाजे उघडण्यात आले आहेत.
या माध्यमातून ५३८७.५६ क्यूमेक (सुमारे १ लाख ९० हजार क्युसेक) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. बंधाऱ्याची पूर्ण साठवण क्षमता (FRL) ३९४.२० मीटर आहे, मात्र पाण्याची पातळी निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक झाल्यामुळे हा विसर्ग आवश्यक ठरला.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणी विसर्गामुळे गोदावरी नदीकाठच्या काही गावांना पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis