अमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स) अतिवृष्टीमुळे भातकुली, दर्यापूर , अंजनगाव, दर्यापूर, द्यारणी, चिखलदरा, अचलपूर, नांदगाव खं, धामणगावरेल्वे, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, तिवसा,या तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी जिल्हा परिषदेच्या बैठकीत शेतकऱ्यांचे दुःख निवेदन देऊन मांडले व वरील मागणी केली. त्यानंतर आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत त्यांनी दिवाळीपूर्वी तात्काळ नुकसान भरपाई आणि कर्जमाफी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.
दौऱ्यादरम्यान, आ. राणा यांनी शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे शेतातील नुकसान पाहणी साठी स्वतः पाण्यात उतरून अधिकाऱ्यांना उतरविले तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी श्री.दराडे,तहसीलदार श्री. अजित येडे, गटविकास अधिकारी , सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी प्रतीनिधी श्री. सराफ, तालुका कृषी अधिकारी श्रीमती भोसले तसेच इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.युवा स्वाभिमान पक्षाचे ग्रामीण पदाधिकारी मंगेश पाटील, आशिष कावरे, विनोद जायलवाल व भातकुली तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी