अमरावतीत दुप्पट नोंदणीचे लक्ष्य गाठा – रवींद्र चव्हाण
पदवीधर पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहअमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स.) गेल्या निवडणुकीत कोण उभे राहावे आणि कोणी माधार घ्यावी, हे ठरले नव्हते. प्रत्येक निवडणुकी कार्यकत्यांच्या मेहनतीवर लढवली जाते. गतवर्षी सुद्धा कार्यकत्यांनी अतोना
दुप्पट नोंदणीचे लक्ष्य गाठा – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची कार्यकर्त्यांना साद  पदवीधर पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह


पदवीधर पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहअमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स.) गेल्या निवडणुकीत कोण उभे राहावे आणि कोणी माधार घ्यावी, हे ठरले नव्हते. प्रत्येक निवडणुकी कार्यकत्यांच्या मेहनतीवर लढवली जाते. गतवर्षी सुद्धा कार्यकत्यांनी अतोनात मेहनत घेतली, त्या मेहनतीचे चीज ही झाले फक्त उमेदवार निवडून आला नाही, बाची मात्र गेल्या निवडणुकीत झालेली चुकी करायची नाही. देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या उमेदवारालाच विजयी करण्याचा संकल्प करायचा आहे. ज्या उमेदवाराला आपल्यापेक्षा सर्वाधिक मते मिळाली, त्याच्यापेक्षा दुप्पट मतदारांची नोदणी या निवडणुकीमध्ये करण्याचा संकल्प करा, असा कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकत्यांना दिला. पी आर पोटे पाटील महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित पद‌वीधर पदाधिकारी मेळाव्याला ते मार्गदर्शन करत होते. मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री डॉ. ऍड.सरचिटणीस उपेंद्र कोठेकर, संजय कुटे, आमदार रणधीर आकाश फुडकर, खासदार डॉ. अनिल बोंडे, सावरकर, भाजपा आमदार प्रताप अडसड, प्रवीण तायडे, उमेश यावलकर , भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख शहराध्यक्ष नितीन धांडे, आमदार प्रवीण पोटे प्रभुदास भिलावेकर, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी निवेदिता चौधरी, शिवराय कुलकर्णी, संगीता शिंदे चंद्रशेखर भोयर राधा कुरील व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांनी कोकण निवडणुकीचे उदाहरण दिले आणि काम कसे करायचे यासंदर्भात टिप्स दिल्या. त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांचा उत्साह हा कायम असला पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असेल तरच आपण निवडणुकीत टिकू शकतो. त्यामुळे संघटनेचे काम करताना पूर्ण ताकदीने उतरा, विचार झालेला पूर्ण ताकदीने जनतेपर्यंत पोहोचवा. ३० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नोंदणी प्रक्रियेकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांनी नोंदणी केली पाहिजे. प्रत्येक पक्ष कार्यकत्र्यान देखील या कामात सहभागी व्हायला पाहिजे. निवडणुकीत विजयी व्हायचं असेल तर अधिकचे गणित करता आले पाहिजे. यावेळी त्यांनी उदाहरण दिले की मंचावर असलेल्यांच्या काही संस्था आहेत, त्या संस्थेमध्येच कितीतरी नोंदणी होऊ शकते. त्यामुळे ती मते पक्की समजून त्या पद्धतीने अनेक मतदार नोंदणी करायला हवी. गेल्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला १८,००० मते मिळाली होती, यावेळी आपल्याला ३५००० मते मिळायला हवी. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नवरात्रीचा संदर्भ देत त्यांनी प्रत्येकाने संकल्प करावा, असेही सांगितले. मतदार नोंदणी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवतील त्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याला करावे लागेल, कारण अमरावती मतदारसंघातून आपल्या विचाराचा आमदार पाठवायचा आहे, हीच भेट द्या, असेही ते म्हणाले. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande