अकोल्यात गटारात एक जण गेला वाहून
अकोला, 27 सप्टेंबर (हिं.स.)। अकोला शहरातील टिळक मार्ग परिसरात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मोठा अनर्थ घडला आहे. भूमिगत गटाराचा एक भाग गेल्या अनेक महिन्यांपासून उघडाच पडून होता. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.आ
प


अकोला, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

अकोला शहरातील टिळक मार्ग परिसरात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मोठा अनर्थ घडला आहे. भूमिगत गटाराचा एक भाग गेल्या अनेक महिन्यांपासून उघडाच पडून होता.

नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.आज सकाळपासून शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान टिळक मार्गावरील खुल्या गटाराजवळून जाताना एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो थेट गटारात कोसळला. पावसामुळे पाणी तुडुंब भरल्याने त्या इसमाचा काहीच पत्ता लागलेला नाही.घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जीवाला याचा फटका बसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नागरिकांचा सवाल आहे की, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने गटाराचा भाग दुरुस्त केला नाही, त्याची जबाबदारी कोण घेणार?

या घटनेमुळे पुन्हा एकदा अकोला महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande