अकोला - सतर्कता जागरूकता महिन्यानिमित्त बाइक रॅलीचे आयोजन
अकोला, 27 सप्टेंबर (हिं.स.) – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अकोला यांच्यावतीने आज सतर्कता जागरूकता महिन्यानिमित्त भव्य बाइक रॅलीचे आयोजन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. रॅलीची सुरुवात क्षेत्रीय कार्यालय, आदर्श कॉलनी येथून झाली
P


अकोला, 27 सप्टेंबर (हिं.स.) – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अकोला यांच्यावतीने आज सतर्कता जागरूकता महिन्यानिमित्त भव्य बाइक रॅलीचे आयोजन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.

रॅलीची सुरुवात क्षेत्रीय कार्यालय, आदर्श कॉलनी येथून झाली व गोरक्षण रोड, नेहरू पार्क, मूर्तिजापूर रोड, तुकाराम चौक मार्गे पुन्हा क्षेत्रीय कार्यालय, अकोला येथे यशस्वीरीत्या पूर्ण झाली. रॅलीदरम्यान “भ्रष्टाचाराला मुळापासून नष्ट करा” असे प्रभावी घोषवाक्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

या प्रसंगी क्षेत्रीय प्रमुख श्री. पंकज कुमार यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात व्हिजिलन्स ऑफिसर श्री. राजेश वर्मा, क्षेत्रीय उपप्रमुख श्री. अरुण प्रकाश, मुख्य व्यवस्थापक श्री. सचिन डोके, श्री. अभिषेक कुमार आणि श्री. नवीन झा यांच्यासह क्षेत्रीय कार्यालय व विविध शाखांतील सर्व अधिकारी व कर्मचारी सक्रियपणे उपस्थित होते.

रॅलीचे उद्दिष्ट समाजात सतर्कता, पारदर्शकता आणि भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करणे हे होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली की ते सदैव प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जबाबदारीची कार्यपद्धती स्वीकारून बँकिंग सेवा अधिक सक्षम करतील.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अकोला यांच्यावतीने आयोजित ही रॅली सतर्कता जागरूकता महिन्याच्या दिशेने एक उपयुक्त पाऊल ठरले असून यास स्थानिक नागरिक व बँक परिवाराकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande