अकोल्यात महापालिकेचा निष्काळजीपणा; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू
अकोला, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। अकोला शहरातील टिळकरोड बियाणी चौक मार्गावर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मोठा अनर्थ घडला आहे. अनेक महिन्यांपासून उघडे असलेले भूमिगत गटार झाकले न गेल्याने आज जोरदार पावसात एका व्यक्तीचा तोल जाऊन तो गटारात पडला आणि तो बे
P


अकोला, 27 सप्टेंबर, (हिं.स.)।

अकोला शहरातील टिळकरोड बियाणी चौक मार्गावर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मोठा अनर्थ घडला आहे. अनेक महिन्यांपासून उघडे असलेले भूमिगत गटार झाकले न गेल्याने आज जोरदार पावसात एका व्यक्तीचा तोल जाऊन तो गटारात पडला आणि तो बेपत्ता झाला आहे.

या दरम्यान, त्याचवेळी वसंत देसाई स्टेडियमजवळ महापालिकेचा मोठा विद्युत पोल रस्त्यावर कोसळून एक नागरिक किरकोळ जखमी झाला. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून अग्रेसर चौक ते रेल्वे स्टेशन मुख्य मार्गावर दुभाजक भरण्याचे काम संत गतीने सुरू आहे. त्यामुळे आज विद्युत पोल पडून एक व्यक्ती जखमी झालाय. तर दुचाकी ने जाणारे दोन व्यक्ती यामधून सुदैवाने वाचले. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे महापालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande