गांधीग्रामची गुळपट्टी पोहचली मंत्रालयात
अकोला, 27 सप्टेंबर (हिं.स.)। महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याद्वारे मंत्रालयामध्ये नवतेजस्विनी महोत्सव दि. २३ ते २६ सप्टेंबर दरम्यान झाला. प्रदर्शनामध्ये गांधीग्राम या गावातील राधास्वामी बचत गटाचा स्टॉल कल्पनाताई निचळे यांच्या माध्यमातून लावण्य
P


अकोला, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याद्वारे मंत्रालयामध्ये नवतेजस्विनी महोत्सव दि. २३ ते २६ सप्टेंबर दरम्यान झाला.

प्रदर्शनामध्ये गांधीग्राम या गावातील राधास्वामी बचत गटाचा स्टॉल कल्पनाताई निचळे यांच्या माध्यमातून लावण्यात आला. त्यात गांधीग्रामच्या गुळपट्टीला प्रदर्शनामध्ये ग्राहकांची मोठी पसंती मिळाली व दोन क्विंटल माल विकला गेला. मंत्रालयातील सर्व अधिकारी ,कर्मचार याबरोबरच अभ्यागत नागरिकांनीही प्रतिसाद दिला.

महिलांना मंत्रालयामध्ये आपला माल विकण्याची सुवर्णसंधी महिला आर्थिक विकास महामंडळाने आयोजित करून दिली. त्याबद्दल बचत गटातील महिलाभगिनींनी आनंद व्यक्त केला. त्यांनी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा व माविम जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे व अधिकाऱ्यांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande