लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचे आवाहन
अकोला, 27 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना'' अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळत असून, जिल्ह्यातील लाखों महिलांना याचा फायदा होत आहे. महिलांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी KYC
लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचे आवाहन


अकोला, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळत असून, जिल्ह्यातील लाखों महिलांना याचा फायदा होत आहे. महिलांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी KYC (नो युअर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड यांनी केले आहे.

'माझी लाडकी बहिण योजना' ही महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली असून, १८ ते ६० वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना त्याचा लाभ मिळतो. योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाखो महिलांना पैसे वितरित करण्यात आले आहेत. मात्र, KYC अपूर्ण असल्याने अनेक तक्रारी समोर येत आहेत. जिल्हा प्रशासनानेही याबाबत जागरूकता मोहीम राबवली आहे. अकोला जिल्ह्यात लाखों महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून, उर्वरित महिलांना KYC पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना सरकारच्या या योजनेचा पूर्ण लाभ मिळावा, यासाठी KYC ही मूलभूत प्रक्रिया आहे. आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर यांची जोडणी करून ही प्रक्रिया पूर्ण करणे सोपे आहे. ज्या बहिणींनी अद्याप हे केले नाही, त्यांनी तातडीने नजीकच्या सेतू किंवा CSC केंद्रात जाऊन पूर्ण करावे. तसेच स्वतःच्या मोबाईल वरूनही KYC करता येणे शक्य आहे, याकरिता लाडकी बहीण योजनेच्या LADAKIBAHIN, MAHARASHTRA.GOV. IN या लिंकवर किंवा क्यूआर कोड स्कॅनकरून KYC करता येणार आहे. महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन शिवसेना पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

--

शिवसेना पक्ष नेहमीच महिलांच्या हक्कांसाठी लढत आला असून ही योजना महिलांच्या स्वावलंबनासाठी असून KYC ही छोटीशी प्रक्रिया पूर्ण करून लाभ घ्या. शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून KYC साठी मदत उपलब्ध करवण्यात येत आहे. पक्षाच्या कार्यालयात येऊन महिलांना मार्गदर्शन मिळू शकते. -- रमेश गायकवाड, शहर प्रमुख शिवसेना

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande